Home Cities अमळनेर जिल्हाधिकारी उदया अक्षयतृतीयादिनी आर्डी, अनोरे येथे करणार श्रमदान

जिल्हाधिकारी उदया अक्षयतृतीयादिनी आर्डी, अनोरे येथे करणार श्रमदान

5ac753f2edfb1 satyamev jayate ceo government of maharashtra not providing financial assistance to paani foundation

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील आर्डीआनोरे या गावात वाटर कप या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने येथील नागरिकांचा उत्साह वाढावा या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांची टीम अक्षय तृतिया शुभमुहूर्तावर उद्या सकाळी श्रमदानासाठी येणार आहेत.

7 मे 2019 रोजी पाणी फाऊंडेशन ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-4’ साठी आर्डी आनोरे या गावात महाश्रमदानाचे आयोजन सकाळी 6 ते 8 या वेळेत करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील या अभियानात सहभागी होणार आहे. तरी या श्रमदानासाठी परीसरातील गावातील तरूण, नागरीक, पंचायत समितीचे व महसूल, आरोग्य, बांधकाम समितीचे कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound