चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील शास्त्रीनगर येथील एकाचे बंद घर घडून ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवार १६ मे रोजी सकाळी ११ वाजता उघडतील आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप रघुनाथ चौधरी वय-५८, रा. दुर्गा माता मंदिर जवळ शास्त्रीनगर,चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवार १६ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचे समोर आले आहे. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिलीप चौधरी यांनी सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश बेलदार हे करीत आहे.