जळगाव प्रतिनिधी । सावखेडा शिवारातील पोतदार शाळेजवळील शांतीनगरात घरातून रोकड आणि दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कैलास बाबुराव चव्हाण (वय-४०) रा. शांतीनगर पोतदार शाळेच्या मागे, सावखेडा शिवार जळगाव हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ ते २९ डिसेंबर रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील ६० हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कैलास चव्हाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरिलाल पाटील करीत आहे.