यावल प्रतिनिधी । गुजरात राज्यातील एका शेतकऱ्याची फसवणुक करून परस्पर विकलेले महागडा जेसीबी अखेर यावल पोलीसांनी केले गुजरात पोलीसांच्या स्वाधीन केला आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी, गुजरात राज्यातील बडोदा येथील राहणारे शेतकरी नागजीभाई भरवाड यांनी मार्च २o२oमहिन्यात भरूच( बडोदा ) गुजरात पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कडील सुमारे ३२ लाख रुपये किमतीचे जेसीबी मशीन कोरोना संसर्गाच्या काळात एका व्यक्तिने महिन्या पोटी चांगले भाडे मिळवुन देण्याचे आमीष दाखवुन व विश्वास संपादन करून जेसीबीची संपुर्ण कागदपत्रे घेवुन जावुन त्यांच्याकडील जेसीबी मशीन ताब्यात घेवुन परस्पर शिरपुर येथील राहणार योगेस गुलाब पाटील वय३६ वर्ष यांनी दहा लाख५० हजार रूपयांना विकुन पोबारा केला होता. भरूच पोलीसांनी जेसीबीचे मुळ मालक नागजीभाई भरवाड यांच्या तक्रारी वरून गुजरात राज्यातील सिमालगत असलेल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी संदर्भात सविस्तर माहिती मोबाइलवर पाठविले. यावलचे पोलीस उप निरिक्षक विनोद खांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची यंत्रणा योग्य दिशेने फिरवत अखेर दिनांक १६ नोव्हेंबर २० रोजी यावल तालुक्यातील उंटावद येथील चिंचोली रस्त्या वरून ताब्यात घेवुन याची खबर ही भरूच पोलीसांना कळविल्याने आज दिनांक१७ नोव्हेंबर २० रोजी भरूच गुजरात पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक व्ही .एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॅड कॉंस्टेबल हिरेन्द्रभाई वसावा यांच्यासह जेसीबी मालकांची मुले हरिषभाई भरवाड व विजयभाई भरवाड हे यावल येथे दाखल झाले होते. दरम्यान यावल पोलीसांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून अखेर जेसीबी मशीन हे भरूच पोलीसांच्या स्वाधिन केले .भरूच पोलीसांनी या गुन्ह्यासंदर्भात जेसीबी खरेदी करणारा शिरपुर येथील योगेश गुलाब पाटील यास संशयीत म्हणुन चौकशी करीता ताब्यात घेतले असुन , गुजरात पोलीसांनी तात्काळ जेसीबी शोधकामात महत्वाची कामगीरी केल्या बद्दल यावल पोलीसांच्या विशेष आभार मानले.
अखेर परस्पर विकलेले जेसीबी गुजरात पोलीसांच्या स्वाधीन
4 years ago
No Comments