मनवेल ग्रामपंचायत सरपंचपदी जयसिंग सोनवणे तर उपसरपंचपदी मिनाक्षी पाटील

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयसिंग सोनवणे तर उपसरपंचपदी मिनाक्षी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सरपंचपद हे आरक्षणानुसार अनु.जातीसाठीचे राखीव असल्याने जयसिंग सोनवणे यांचा सरपंचपदाकरिता एकमेव अर्ज तर उपसरपंच पदासाठी मिनाक्ष्री गोविंद पाटील व विक्रम रुपसिंग पाटील यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते त्या राजकीय नाट्यमय घडामोडी नंतर विक्रम पाटील यांनी माघार घेतल्यानंतर सरपंचपदी जयसिंग सोनवणे तर उपसरपंचपदी सौ.मिनाक्ष्री पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.वाय.तडवी यांनी जाहीर केले.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड होताच वढोदा  प्र.यावल येथील नवनिर्वाचित सरपंच संदिप सोनवणे यांनी गुलाब पुष्पदेऊन सत्कार केला.यावेळी माजी प.स.सदस्यं अरुण आबा पाटील, भुवनेश्वरी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोपाल पाटील, सामाजिक कार्यकर्ता गोविंद पाटील, नामदेव पाटील, सुनिल पाटील ,महेंद्र पाटील ,संजय पाटील , उदयभान पाटील , बाळकृष्ण पाटील सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यं मंगलसिंग पाटील, सौ.देवयानी कोळी,नरहर भिल, सुनंदा पाटील, कमलबाई भिल ,अलका पाटील या प्रामुख्याने उपस्थीत होते.

ग्रामसेवक भरत पाटील, संतोष पाटील यांनी निवडणूक कामी सहकार्य केले तर कायदा सुव्यस्था राखण्याकामी पोलीस कर्मचारी  राजेश वाढे व नितीन चव्हाण यांनी बदोबस्त चोख ठेवला.

 

Protected Content