जय पवारने मानला वडील अजित पवारांचा सल्ला

jay pawar

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुलांना राजकारणात न येता शेती किंवा उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता. वडीलांनी दिलेला सल्ला मुलगा जय पवारने मनावर घेतला आहे. मी राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा जय पवार यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जय पवार सध्या बारामतीत प्रचारात व्यस्त आहे. वडील अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा जय पवार सांभाळत आहेत. जय यांच्या उपस्थितीत बारामती शहरात काल पदयात्रा काढून अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जय यांनी सांगितले की, आपण राजकारणात आलो तरी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. गेल्या तीन-चार वर्षापासून माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु आहे. जरी मी राजकारणात उतरलो तरी मी पक्षाचे कोणते तरी पद घेऊन, सामान्य माणसांसाठी काम करेन, पण मी कोणतीही निवडणूक लढणार नाही’ अशी घोषणा जय यांनी केली.

Protected Content