Home Cities चोपडा पंकज ग्लोबल स्कूलमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी 

पंकज ग्लोबल स्कूलमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी 


pankaj school

चोपडा, प्रतिनिधी | ‘गोविंदा आला …रे आला’ च्या गजरात श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत नृत्य करत पंकज ग्लोबल स्कूलमध्ये चिमुकल्यांनी दहिहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. सुरेश पंडित बोरोले यांनी राधा कृष्णच्या वेशभूतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली.

 

शाळेतील सर्व चिमुकल्यांनी राधा कृष्ण, गोप-गोपिका यांच्या वेशभूषा करुन गरबा खेळला. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी सुरेश बोरोले व संस्थेचे व्हा.चेअरमन अविनाश राणे यांनी मुलांचा उत्साह वाढवला. तसेच यावेळी तीन थर रचून विद्यार्थ्यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound