जान्हवी बागुलचे दहावीच्या परीक्षेत यश

aa2e7fa4 4b41 4635 a763 d286adfc17e4

अमळनेर (प्रतिनिधी) नुकताच दहावीचा निकाल लागला त्यात महाजन हायस्कुलची विदयार्थ्यांनी जान्हवी योगेश बागुल हिला ८३:८० टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे जान्हवीने संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत.

नियोजनबद्ध अभ्यास, प्रश्न पत्रीकेचा सराव, आई वडीलांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे यश मिळाले,असे जान्हवीने सांगितले. तिला विज्ञान विषयात पदवी घेऊन स्पर्धा परीक्षाकडे वळायचे आहे.जान्हवीला प्राचार्य बाविस्कर सर, उपप्राचार्य यू. बी. माळी. तसेच गणित शिक्षक व्ही. बी. पाटील, मराठी शिक्षक एस. यू. माळी, विज्ञान शिक्षिका वर्षा भामरे, क्रांती क्लासेसचे (संस्कृत) अण्णा माळी व गौतम क्लासेसचे गौतम पाटील या सोबत आई व वडिलांचे सतत मार्गदर्शन होत होते.

कु. जान्हवीचे समाजातील उच्च विभूषित व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटीत व फोनद्वारे संपर्क करून अभिनंदन व सत्कारही केला आहे. देवेंद्र खैरनार, (सिनिअर इंजिनिअर, ग्लोबल इन्फॉर्मेटिक्स डिविजन, जर्मनी), सेवानिवृत्त अभियंता व्ही. बी.माळी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर योगेश उशिरे, धुळे उपजिल्हाधिकारी पल्लवी शिरसाठ, डॉ. उदयकुमार खैरनार, समाज संचालक मंडळ सदस्य अमळनेर, समाज कल्याण अधिकारी हर्षद अरुण पाटील, राजन व्ही. माळी. एम एस ( यू एस ए), दीपक सोनवणे अभियंता विज निर्मिती केंद्र, नागपुर आदी मान्यवरांनी तिचे कौतुक केले आहे.

Add Comment

Protected Content