मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील तहसीलदार यांच्यातर्फे स्वस्त धान्य दुकानदारांना निवेदनाच्या माध्यमातून 100% धान्य मिळत नसल्यामुळे तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना तसेच गलथान कारभारामुळे तहसीलदार यांच्यावर कारवाई होण्याबाबतचे निवेदन जनशक्ती प्रहार संघटनेचे कार्यकर्ते डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे केलेली होती.
स्वस्त धान्य दुकानदार यांना लाभार्थी संस्खेनुसार नियमत मंजुर करावे तसेच पात्र लाभार्थी वंचीत राहु नये याविषयीची तक्रार यापुढे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होवु नये अशा ताकीदीची नोटीस ६ जानेवारी रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी तहसिलदार मुक्ताईनगर यांना पत्रकान्वये दिलेली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात 85 स्वस्त धान्य दुकान असून जानेवारी 2021 महिन्याचा धान्यसाठा प्रत्येक दुकानाला 100% पैकी 70 व 40 टक्के अशाच कमी प्रमाणात मिळणार असल्याचे तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच हा साठा कमी प्रमाणात मागवला तर हजारो गोरगरीब लाभार्थी या धान्यापासून वंचित राहतील. तसेच जानेवारी महिन्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचे चलन नोव्हेंबर महिन्याच्या पाॅश मशीनच्या डाटा नुसार भरण्याचे आदेश तहसिलदारांकडून देण्यात आले. परंतु नोव्हेंबर महिन्याचे धान्य उशिरा आल्यामुळे मशीनचा डाटा 12 डिसेंबरपर्यंत करण्यात आला. त्यामुळे दुकानदारांनी 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत हजारो लाभार्थ्यांना वाटलेले धान्य मशीनवर दिसत नसल्यामुळे फक्त नोव्हेंबर महिन्यात वाटलेले धान्य ग्राह्य धरले जाईल असे तहसीलदारांकडून सांगण्यात आले.
परंतु प्रशासनाने दुकानदारांना धान्य उशिरा द्यायचे व नंतर मुदत वाढून द्यायची परंतु वाटप झालेले धान्य हे ग्राह्य धरणार नाही, असे सांगायचे तसेच मागील वर्षात धान्य दुकानदार यांना नियतनयेताना बाबत एकही तक्रार नव्हती. परंतु विद्यमान तहसीलदार यांनी कार्यकाळ सांभाळल्या पासून स्वस्त धान्य दुकान नोंद संबंधित त्यांचा गलथान कारभार दिसून येत आहे व हजारो गोरगरीब जनतेला स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.