आ. शिरीष चौधरी यांच्या महामंडलेश्‍वर जनार्दन महाराजांना शुभेच्छा !

शेअर करा !

रावेर प्रतिनिधी । अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपुजनासाठी आमंत्रण मिळाल्याचा बहुमान मिळाल्याबद्दल आ. शिरीष चौधरी यांनी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

store advt

महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांना दिनांक ५ ऑगस्ट रोजी प्रभू श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथे भव्य मंदीर निर्माण कार्याच्या शिलान्यासासाठी आमंत्रित केले आहे. जनार्दन महाराज हे दिनांक २ ऑगस्ट रोजी तापी पूर्णा संगमाचे जल तसेच संत मुक्ताई व योगी चांगदेव यांच्या पावन भूमीतील पवित्र माती सोबत घेऊन अयोध्या येथे प्रस्थान करीत आहेत. त्या प्रित्यर्थ प. पू. स्वामी जनार्दन महाराज यांना मतदार संघातील जनतेच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी व प. पू. स्वामीजींचे आशीर्वाद घेण्यासाठी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी महाराजांची भेट घेतली.
यावेळी शाल,हार,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्या सोबत डॉ. सुरेश पाटील खानापूर व लोकसेवक मधूकरराव चौधरी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य व्ही. आर.पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!