जळगाव येथून जन गण मन अभियानाची होणार सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संविधानिक मूल्यांची रक्षा करण्यासाठी आणि देशाचे भविष्य सुरक्षित व समृद्ध बनवण्यासाठी भारताची समृध्द विविधता व विरासत चा वारसा पुढे नेण्यासाठी जानेवारी महिन्यात जन गण मन अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. भारत जोडो अभियाना द्वारा 3 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत एक ऑनलाईन आणि जमिनी स्तरावर अनेक कार्यक्रमांची एक श्रृंखला तयार गेली आहे.

अभियानात भारतातील सुज्ञ नागरिकांना सहभागी होण्यासाठी खान्देश स्तरीय मिस्ड कॉल नंबर 9549417445 जाहीर करण्यात आला आहे. भारत जोडो अभियान हा भारतातील नागरिकांचा मंच आहे. ज्यात भारतातील 15 राज्यातील अनेक संघटन सहभागी आहेत तसेच खानदेशातील 123 संघटना सहभागी आहेत. ह्या अभियानाचा उद्देश भारतातील सामाजिक सलोखा ची रक्षा करणे, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय च्या बाबतीत आग्रही असणे त्याची आठवण उजागर करणे आणि सगळ्या नागरिकांन मधील समानता आणि भाईचारा साठी प्रयत्न करणे आहे. ज्या द्वारे भारतातील लोकतांत्रिक मूल्य आणि संस्थांची रक्षा केली जावी.

जन गण मन अभियान आम्हाला विश्वास देतो की संघटित सांप्रदायिक उन्माद च्या षडयंत्राला आमची सह जीवनाची आमची उज्ज्वल व सुसंस्कृत विरसात आणि आमचे लोकतान्त्रिक, धर्मनिरपेक्ष, गणराज्य च्या संविधानिक ढाच्यावर वर हावी होवू दिले जाणार नाही. आमचा विश्वास आहे की भारताचे आम्ही लोक, भारतीय नागरिक शांती आणि सौहदर्यापूर्ण सह जीवनाची आस आहे परंतु वर्तमान परिस्थितीत त्यांना ही प्रतिबद्धता व्यक्त करण्याचे वातावरण नाही. त्यामुळे आपल्या देशाची नियती नक्की करणारे वर्ष आहे, हे अभियान देशातील सुज्ञ नागरिकांना ही संधी उपलब्ध करण्ये व जोडण्यासाठी चा प्रयत्न आहे.

हा अभियान 3 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत चालेल, ह्या अभियानाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, बाबा साहेब आंबेडकर, फातिमा बी, महात्मा गांधी, जिजाऊ, बिरसा मुंडा, लाल बहादूर शास्त्री ह्या सारखे महान राष्ट्र निर्माते आणि संक्रांती सारख्या सणामधून आपण भारतीय नागरिकांना स्वतंत्रता, समानता आणि भाईचारा आणि न्याया साठीचे कार्यक्रम आणि प्रतिदिन विविध कार्यक्रम सामील आहेत. तसेच या संदर्भात रॅली, पोस्टर बॅनर व सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून हे अभियान राबवले जाणार आहे यातील

प्रमुख उपक्रम

१) ०३ जानेवारी – सावित्रीबाई फुले जयंती

२) ०३ जानेवारी – हॉकी सुवर्ण पदक विजेता, संविधान सभेतील आदिवासींचा आवाज जयपालसिंह मुंडांची जयंती

३) ०५ जानेवारी अखिल भारतीय महिला संमेलनाचे स्थापना वर्ष

४) ०६ जानेवारी – अवध किसान आंदोलन, रायबरेलीमध्ये शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराचे वर्षश्राध्द

५) ०९ जानेवारी – पहिली महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती

६)०९ जानेवारी – बिरसा मुंडांचा उलगुलान विद्रोह दिवस

७) ०९ जानेवारी – प्रवासी भारतीय दिवस

८) ११ जानेवारी – लाल बहादूर शास्त्रींची पुण्यतिथी’ जय जवान जय किसान’

९) १२ जानेवारी – माँसाहेब जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती’ राष्ट्रीय युवा दिन’

१०) १३ जानेवारी – लोहडी / भोगी वाईटावर चांगल्याचा विजय

११) १४ जानेवारी – मकर संक्रांत

१२) १७ जानेवारी – गुरू गोविंदसिंग जयंती, प्रकाश वर्ष

१३) १७ जानेवारी – रोहित वेमुला स्मृती दिन

१४) १८ जानेवारी – स्वातंत्र्यसेनानी मागासवर्गीय मुसलमानांचे अग्रेसर नेते अब्दुल कय्युम अन्सारींची पुण्यतिथी

१५) २० जानेवारी – भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांची पुण्यतिथी

१६) २२ जानेवारी – गदर पार्टीचे अध्यक्ष क्रांतिकारी सोहन सिंह भकना यांची जयंती

१७) २३ जानेवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

१८) २५ जानेवारी – राष्ट्रीय मतदार दिवस

१९) २६ जानेवारी – भारताचे संविधान, बाबासाहेब आंबेडकर आणि प्रजासत्ताक दिन

२०) ३० जानेवारी – महात्मा गांधी बलिदान दिवस, शहीद दिवस

या उपक्रमांचे आयोजक कविता कुरुंगुटी, राष्ट्रीय सचिव भारत जोडो आंदोलन संजय मं. गो. सालार, सुरेंद्र पाटील, लीना पवार, प्रा. शांताराम बडगुजर, प्रा अशोक पवार, सचिन धांडे, प्रा जयसिंग वाघ, फहीम पटेल, नारायण वाघ, सोमनाथ पाटील, अजय पाटील हे आहेत.

Protected Content