गरुड विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धी.शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलित, आ.ग.र.गरूड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शालेय प्रांगणात महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती पी.एस.पाटील मॅम होत्या तसेच मुख्याध्यापक एस पी उदार, पर्यवेक्षक जे.एस.जुमळे, पर्यवेक्षक विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

या प्रसंगाचे औचित्य साधून वीस ते पंचवीस विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक मनोगतात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी.जी.पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी केलेलं कार्य स्त्री शिक्षणाच्या दृष्टिकोनातून उल्लेखनीय असून, त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हटली जाते. तर त्यांनी जोतिबा फुले वारले त्याप्रसंगी यशवंतराव या त्यांच्या दत्तक पुत्राने प्रेत यात्रेच्या पुढे टिटवे धरावे म्हणजे त्याला वारस हक्क मिळेल. त्यावेळेस जोतिबांच्या पुतण्यांनी या गोष्टीला विरोध केला म्हणून त्यावेळेस स्वतः सावित्रीबाई फुले पुढे आल्या व त्यांनी स्वतः प्रेत यात्रेच्या पुढे टिटवे धरले व त्या अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या अशा परिवर्तनाच्या जनक म्हणून सावित्रीबाईंचा उल्लेख याप्रसंगी सरांनी केला.

या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,मुख्याध्यापक, पर्वेक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.शेवटी अध्यक्षीय भाषण झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.पी.पाटील यांनी केले तर आभार आर.आर. सोनवणे यांनी मानले तदनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Protected Content