बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील जामठी येथे एका विद्यार्थीची छेडखानी करणार्याची जमावाने चांगलीच धुलाई केल्याची घटना घडली.
याबाबत वृत्त असे की, जामठी बसस्थानक परिसर ते येथील चि.स.महाजन माध्यमिक विद्यालयापर्यंत गोरनाळा (ता.जामनेर) येथील विद्यार्थिनीची सध्या गोरनाळा येथे राहणार्या २० वर्षीय युवकाने छेड काढली. याबाबत विद्यार्थिनीने कुटुंबियांना माहिती दिली. त्यांनी जामठी बसस्थानक गाठून युवकास पकडून त्याची धुलाई केली. यामुळे येथे मोठी गर्दी जमली होती.