जामनेरची स्वाती संध्यान किक बॉक्सिंग स्पर्धेत तृतीयस्थानी

WhatsApp Image 2019 11 25 at 18.59.20

जामनेर, प्रतिनिधी| नाशिक विभागीय, क्रीडा अधिकारी व धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे धुळे येथे घेण्यात आलेल्या शालेय विभागीयस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत जामनेर येथील स्वाती संध्यान हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे घेण्यात आलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय जामनेरची खेळाडू १७ वर्षातील मुली वजनगट ५०किलो वजन गटात स्वाती अनिल संध्यान (११ वी विज्ञान ) हिने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापक पी. आर वाघ, उपप्राचार्य प्रा. जे.पी.पाटील, विज्ञान शाखाप्रमुख पर्यवेक्षक प्रा. के. एन मराठे, कला विभाग प्रमुख पर्यवेक्षक प्रा. आर. ए. पाटील, क्रीडा विभाग प्रमुख जी. सी. पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले. स्वाती हिला क्रीडा शिक्षक समीर घोडेस्वार ,गजानन कचरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content