जामनेरात रंगला नमो कुस्ती महाकुंभ

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून नमो कुस्ती महाकुंभ स्पर्धेचे आयोजन गोविंद महाराज संस्थानच्या भव्य पटांगणावर करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार रक्षाताई खडसे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, खासदार उन्मेष पाटील, खासदार सुभाष भामरे, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, प्रमुख भाजपा पदाधिकारी व कुस्तीप्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

या नमो कृषी महा कुंभात पंजाब, हरियाणा, दिल्ली येथून पहिलवान आले असून या कुस्तीच्या दंगलीत हिंदकेसरी ही सहभागी झाले आहेत. त्यामुळे या कुस्तीचा आराखडा मोठ्या प्रमाणावर रंगला. या कुस्ती महा आकारात मोठमोठे मल्ल व पैलवान स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले असून ही स्पर्धा दुपारी एक वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत चालली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर कुस्ती पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिकही या ग्राउंड वर उपस्थित होते

Protected Content