जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जामनेर आषाढी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे काढण्यात आलेल्या विठूराया रुक्मणी पालखी दिंडीमध्ये पोलीस कर्मचारी ही भक्तिमय सागरात मग्न झाल्याचे दिसून आले.
नेहमी कोणतेही सण असो सदैव जनतेच्या सेवा व सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस दादाही वाटतं कधी कधी आपणही सण उत्सव साजरे करावे, या भावनेने जामनेर शहरातील पोलीसही पालखी दिंडी सोहळा सुरक्षा देत असताना भक्तिमय वातावरणामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
यावेळी पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रमेश कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड, तुषार पाटील, निलेश घुगे, जितेंद्र ठाकरे आधी पोलीस बांधवांनी स्वतः दिंडी मधील पालखीला खांद्यावर घेऊन सहभागी झाले.
त्याचबरोबर या भक्तीमय सागरामध्ये विठुरायाच्या भक्ती गीत गात विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल या गजरामध्ये रमले पाहायला मिळाल्याने एक वेगळा आनंद पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसत होता.