जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील तोंडापूर येथील गावाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या व्यापारी संकुलातील जुगार अड्डयावर पोलिसांनी कारवाई केली.
तोंडापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजुला असणार्या व्यापारी संकुलात जुगार अड्डा सुरू होता. याबाबत काही ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत पहूर पोलिसांनी दुपारी १२ वाजेदरम्यान एका खासगी वाहनातून जाऊन कारवाई केली.
यात जुगार अड्डयाचा मालक करीम अब्दूल कुरेशी, युवराज श्रावण पाटील, शेख इम्रान युनूस शेख तसेच शेख हसन शेख सांडू, अरूण दामू जिरी, इब्राहिम तडवी यांच्यासह एकूण १२ संशयितांना ताब्यात घेतले असून जुगाराचे साहित्य, रोख रकमेसह ५२०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार भरत लिंगायत, कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख, ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.