जामनेर तालुक्यात हातभट्टींवर छापासत्र; पाच जणांविरूध्द गुन्हा

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव आणि गाडेगाव परिसरातील हातभट्टींवर आज पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापे टाकून तब्बल २ लाख ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील तळेगाव व गाडेगाव या गावाच्या परिसरात अवैध हातभट्टी दारू बनवत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांना केली होती त्याआधारे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तळेगाव व गाडेगाव येथे अवैध दारू हातभट्टी उद्ध्वस्त केले असून पाच जणांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीकडून दोन लाख ४७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे व उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांच्या आदेशान्वये व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, तुषार पाटील, रामदास कुमार यांच्या पथकाने दिनांक ३ रोजी तळेगाव येथे दारू हातभट्टी व दारू बनवणारा लागणारे रसायन उद्ध्वस्त केले आहे.

यावेळी जितेंद्र नथु कोळी व प्रकाश नथु कोळी राहणार तळेगाव या दोघांना ताब्यात घेतले असता यांच्याकडे १४० लिटर हातभट्टी दारू किंमत दहा हजार रुपये व दोन दुचाकी वाहन किंमत पंचवीस हजार रुपये जप्त करण्यात आले. तर, गाडेगाव शिवारामध्ये अवैध दारू बनवणार्‍या हातभट्टी व रसायन उद्ध्वस्त करण्यात आले असून यावेळी चार आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये जितेंद्र तुळशीराम पवार, सुनील सांडू सोनवणे, अर्जुन शालिक जाधव, उमाकांत मधुकर वराडे ( सर्व राहणार गाडेगाव ) यांच्याकडून सुमारे एक लाखाचा दारू बनवण्याचे साहित्य व रसायन व एक लाख रुपये किमतीची हिरो होंडा शाईन गाडी जप्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे पहिल्यांदा हातभट्टी दारू बनवणार्‍या वर कारवाई करण्यात आली असून यामुळे आता हातभट्टी दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. किमान आता तरी हातभट्टी दारू प्रमाण तालुक्यात कमी होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून बोलले जात आहे

Protected Content