बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी-सोनाळे शिवारात आज दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून यातील एक शिक्षक आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पहूर – पाळधी – सोनाळे शिवारात आज दुपारी बिबट्याने एका शिक्षकासह अन्य एका व्यक्तीवर हल्ला केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, डॉ. सागर गरुड हे प्रवास करत असतांना त्यांना देखील दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे त्यांनी सांगीतले. डॉ गरुड यांनी त्वरीत वनविभागाशी संपर्क साधला .

बिबट्याने हल्ला चढविल्याची माहिती मिळताच जामनेरचे वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपाल संदीप पाटील , पी . व्ही महाजन वनपाल गोद्री , प्रसाद भारुडे , वनरक्षक पहूर , ए .एस ठोंबरे , वनरक्षक, जामनेर , संदीप पाटील, वनरक्षक गोरताळा , वनरक्षक कोळी , कर्मचारी – जीवन पाटील , गोपाल शिसोदे , भुरा जोगी , ईश्‍वर पारधी यांचे पथक घटनास्थळी तळ ठोकून आहेत. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्मीत झाले आहे.

Protected Content