जामनेर प्रतिनिधी | लोकनेते माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना भारतीय जनता पक्षातर्फे अभिवादन करण्यात आले.
जामनेर लोकनेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील राजमाता जिजाऊ चौकात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे आदींनी मनोगतात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला श्रीराम महाजन, छगन झालटे, नगरसेवक बाबूराव हिवराळे, अतिष झाल्टे, उल्हास पाटील, हेमंत वाणी, सुहास पाटील, रवींद्र झाल्टे, नामदेव पालवे, शिवाजी पालवे, विलास पाटील, नवलसिंग पाटील, आनंदा लाव्हरे, जितू पालवे, अजय नाईक, कैलास पालवे, सुभाष पवार, मयूर पाटील, दीपक तायडे, विलास हिवराळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.