खडसेंना ‘ठाण्या’च्या उपचाराची गरज : गिरीशभाऊंचा पलटवार !

जामनेर प्रतिनिधी | ”ईडीच्या धाकाने एकनाथ खडसे हे चार वेळा कोरोना बाधीत झाले.अपंगाचे खोटे प्रमाणपत्र काय काढले,त्या प्रकरणी दिव्यांग बांधवांनी त्या विरूध्द आंदोलने केली.आता ते मोक्काच्या धाकाने आपल्याला कोरोना झाल्याचे म्हणत असले तर त्यांना खरोखर ‘ठाण्या’च्या उपचाराची गरज आहे”,असा पलटवार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर केला आहे. तर राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिध्द करावी, अथवा याबाबत तक्रार करावी असे खुले चॅलेंज देखील त्यांनी केले आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाचे नेते आ. गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर मोक्काच्या धाकाने त्यांना कोरोना झाला असावा असा संशय व्यक्त केल्याने आ.महाजन यांनी खडसेंच्या प्रतिक्रीयेचा समाचार घेतला आहे.

या संदर्भात आ. गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे स्वत: ईडीच्या उंबरठ्यावर आहे,सात महिन्यापासून जावई जेलमध्ये आहे.आता कोण आत जाते आणि कोण बाहेर जाते हे काळच ठरविणार आहे.मला कोरोना झाला याचे खडसेंनी फार बाऊ करून घेण्याची गरज नाही. माझ्यावर मोक्का लावण्यासाठी व खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांवर दबाव काय आणता हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे.स्वत: खडसे ईडीच्या घेर्‍यात आहे त्यांनी मला शिकविण्याची आता गरज राहीली नाही.त्यांना खरोखर आता ठाण्यात उपचार घेण्याची गरज असल्याचे आ.गिरीष महाजन म्हणाले.

दरम्यान, आमदार महाजन म्हणाले की, राज्यात एकनाथराव खडसे यांच्या पक्षाची सत्ता आहे. मी माझ्या कोरोनाची चाचणी याच सरकारच्या लॅबमधून केलेली आहे. यात त्यांना काही शंका असेल तर त्यांनी आपल्याच सरकारच्या लॅबमधील रिपोर्टबाबत तक्रार करावी, अथवा याच्या सत्यतेची चौकशी करावी असा सल्ला देखील आ. गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!