जळगाव प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात भावाला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीच्या मोठा भाऊकडून वाकीलाकडे काम करत असल्याचे सांगून एकूण 1 लाख 10 हजार रूपयात फसवणूक केल्याप्रकरणी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने विशालसिंग अमरनाथसिंग राजपुत वय – 24 रा. बिहटटा (उत्तर प्रदेश ) अटक केली आहे. तो कारागृहात असून त्याला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपीच्या मोठा भाऊ याची सौरभ अमरनाथसिंग राजपूत वय-29 याची चंद्रकांत सुरळकर वय 36 रा. टॉवर चौक याने 60 हजाराची रुपयात फसवूण केली तसेच यानंतरही वारंवार जीवे मारण्याची धमकी देवून पैशांची मागणी केल्याची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रकांत सुरळकर यास अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाचे त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात विशालसिंग अमरनाथसिंग राजपुत हा आरोपी सध्या कारागृहात असुन त्याचे जामिना करीता त्याचा मोठा भाऊ सौरभ अमरनाथसिंग राजपुत यास नवरात्री दरम्यान जळगावहुन चंद्रकांत गणपत सुरळकर याने मोबाईल वरुन फोन केला. अॅड. देशपांडे या वकीलांकडे काम करीत असतो तुमचा भाऊ विशालसिंग यास जर जामिन करायाचा असेल तर आधी 50,000 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार सौरभ राजपूत याने 27 सप्टेगर रोजी 50 हजार रुपये दिले. यानंतर पुन्हा सुरळकरने मागणी केल्यानुसार सौरभने त्याच्या खात्यात 30 हजार रुपये जमा केले. यानंतर पुन्हा सौरभने जळगावात येवून सुरळकर यास 25 हजार रुपये दिले. असे वेगवेगळ्या दिनांकास सौरभने एकुण 1 लाख 10 हजार रूपये दिले. आपली फसवणूक होत असल्याची खात्री झाल्याने सौरभ याने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांनी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, स.फौ.अशोक महाजन, पोहेकॉ.रविंद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दिपक पाटील, दादाभाऊ पाटील, विनोंद सं.पाटील, अनिल देशमुख, पल्लवी मोरे तसेच सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, दर्शन ढाकणे यांने पथकामार्फत चंद्रकांत गणपत सुरळकर वय – 36 रा.टॉवर चौक यास ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सौरभच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.