रावेर येथे वीज चोरी करणाऱ्या व्यावसायिकास ४ लाखांचा दंड

Crime 21

रावेर, प्रतिनिधी |येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ असलेल्या एकता डेअरीवर शुक्रवारी वीज वितरण कंपनीच्या जळगाव येथील भरारी पथकाने छापा टाकून वीज चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. वीज चोरी केल्याबद्दल सदर ग्राहकास ४ लाख ८५ हजार ७०० रुपये दंड ठोठावला आहे.

जळगाव येथील वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने अचानक एकता डेअरीवर धाड टाकून डेअरीत होणारी वीज चोरी पकडली आहे. वीज संच मांडणीत बदल करीत या व्यावसायिकाने विज चोरी केल्याचे छाप्यात उघडकीस आले आहे. किती महिन्यापासून वीज चोरी सुरु होती यांची माहिती उपलब्ध झालेली नसून वीज चोरी केल्या प्रकरणी मात्र या ग्राहकास ४ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा दंड ठोकला असल्याची माहिती रावेर विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी दिली.

Protected Content