जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुरटी गावात मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असतांना पोलीसांनी अमानुष लाठीहल्ला करून उपोषणकर्त्यांना जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने तोंडापूर शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला. दोषींवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सुराटी गावामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण करणाऱ्या पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला करून मोठ्या प्रमाणावर उपोषण करताना जखमी केले आहे. या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे मराठा समाजाच्या सर्व संघटना च्या वतीने टायर जाळून निषेध करण्यात आला त्याचबरोबर दोषीवर कायदेशीर कारवाई तात्काळ करावी, अन्यथा मराठा समाज तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला असून या मागणीसाठी तोंडापूर गाव हे शंभर टक्के बंद करून सरकारचे निषेध करण्यात आला आहे..