जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । विधान परिषेदेच्या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार निवडून आल्याने जामनेर तालुका भाजपतर्फे नगरपालिका चौकात ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
विधान परिषद निवडणूक भारतीय जनता पार्टीचे पाच उमेदवार विजयी झाले आहे. भाजपाकडे संख्याबळ नसतानाही भाजपाचे सर्वचे सर्व उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यामुळे यांच्या मोठा आनंद झाला असून जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिका चौकात ढोल ताशाच्या गजरात केले व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, कन्नड तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते तुकाराम निकम, नगरपालिका उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, कैलास नरवाडे, अतिश झाल्टे, सुहास पाटील, निलेश चव्हाण, डॉक्टर संजीव पाटील, जि. प. सदस्यपती विलास पाटील, भाजपा सरचिटणीस रवींद्र झाल्टे, आनंद लाहोरे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.