Home Agri Trends सावदा येथे जलक्रांती मोहिमेस प्रारंभ

सावदा येथे जलक्रांती मोहिमेस प्रारंभ

0
43
savda programme

savda programme

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे ‘थेंब अमृताचा लोकसहभागातून जलक्रांती’ या मोहिमेच्या अंतर्गत राबविण्यात येणार्‍या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.

स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष शास्त्री भक्तिप्रकाशदास, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुरेशशास्त्री मानेकरबाबा, आमदार हरिभाऊ जावळे, डॉ.व्ही.जे.वारके यांचे हस्ते जेसीबीचे पूजन करून जलक्रांतीच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राजेश वानखेडे, रवींद्र बेंडाळे, प्रा.व.पु.होले, प्रा.संजय वाघुळडे, अभियंता शशिकांत पाटील, अतुल नेहते, सुहास भंगाळे, मिलिंद पाटील, मनीष भंगाळे, सागर पाटील, बंटी बढे, नईम शेख सलीम, विजय उन्हाळे उपस्थित होते.

दरम्यान, या अभियानासाठी डॉ.व्ही.जे.वारके यांनी २ लाख, किसान दूध संस्थेने १०० लिटर डिझेल, सुहास भंगाळे यांनी दोन दिवस जेसीबी मशीन, सुनील पाटील, जनकल्याण पतसंस्थेने प्रत्येकी ११ हजार, किरण बेंडाळे, रितेश पाटील, अनिल महाजन, डॉ.चंद्रशेखर पाटील, नंदू पाटील, सचिन बर्‍हाटे, योगेश महाजन, अनिल नेमाडे, प्रकाश भंगाळे, प्रवीण पाटील आदींनी अडीच लाखांचे आर्थिक सहकार्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound