Home Cities यावल काँग्रेस पक्षाच्या उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी म्हणून जलील पटेल सन्मानित

काँग्रेस पक्षाच्या उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी म्हणून जलील पटेल सन्मानित


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुंबई येथे दादरच्या टिळक भवन येथील पक्षाच्या कार्यालयात संपन्न झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत राज्यस्तरीय कर्तबगार प्रदेश पदाधिकारी पुरस्कार सन्मानपत्र स्मृतीचिन्ह व शाल देऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते यावल तालुक्यातील रहिवाशी जलील पटेल यांच्या पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन मोठा मानसन्मान करण्यात आला.

मुंबई येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग सेलच्या प्रदेशाध्यक्ष राधिकाताई मखमाले, प्रदेश काँग्रेस कमिटी च्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जळगाव जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व सेलच्या प्रमुख प्रज्ञा वाघमारे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल मेंढे, माजी आमदार डॉ.मिजाहत अली मिर्झा, डॉ. मिनाक्षी सावळकर, पुणे शहराच्या अध्यक्षा कल्पणाताई उनवणे, विशाल गोटे, सविता पंडित, ज्योती उनवणे, कुसुम आलम, अनुरुद्ध साळवे, मजित मेमन, सहील शेख, धनराज राठोड, शेख मोहसीन यांच्यासह राज्यभरातून आलेले काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound