जळगाव प्रतिनिधी । सौंदर्य आणि टॅलेंट यावर आधारित मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल व मिस अर्थ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत निवड होण्यासाठी जयपूर येथे 29 रोजी पार पडलेल्या “ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया” स्पर्धेत जळगावच्या तन्वी मल्हाराने मिस मल्टीनॅशनलचा किताब जिंकला. येत्या डिसेंबर माहिन्यात होणा-या मिस मल्टिनॅशनल स्पर्धेत तन्वी अन्य देशांच्या स्पर्धकांसोबत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तन्वी विविध टप्पे पार करत टॉप 7 मध्ये निवड झाली. टॉप 7 मध्ये प्रत्येकाच्या बुद्धिमत्ता, कॉमनसेन्स, सामाजिक भान या कौशल्याचा कस लागला. यामध्ये तन्वीला दोन प्रश्न विचारण्यात आले होते, “तू रेडिओ जॉकी राहिलेली आहेस, तुझ्या दृष्टीने समोरच्याचा आवाज महत्वाचा आहे की चेहरा?’ यावर तन्वीने अतिशय सहज उत्तर दिले की मी आवाजाला महत्व देईल. कारण चेहर्यावरून गफलत होऊ शकते.” दुसरा प्रश्न तिला “मी टू” या कॅम्पेन बद्दल विचारण्यात आला होता. त्यात तिने सहज उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली.
इतर राऊंड सोबतच सोशल मीडिया राऊंडचा देखील समावेश होता. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्रामच्या पेजवर किती लाईक, शेअर व कमेंट्स मिळतात यावरून गुण दिले जाणार होते. सोशल मीडिया राउंडमध्ये देखील तन्वीला सर्वात जास्त लाईक्स व कमेंट्स मिळाले होते.
तन्वीने आठवी पर्यंतचे शिक्षण सेंट टेरेसा हायस्कुलमध्ये घेतले. नंतर नववी ते बारावी पर्यंतचे तिचे शिक्षण अनुभूती इंटरनॅशनल स्कुलमध्ये, तद्नंतर पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजला बी.ए.इन लिबरल आर्टसला तिने प्रवेश घेतला. पुणे येथे झालेल्या मिस दिवा पुणे या स्पर्धेत तिने सहज म्हणून भाग घेतला असून या स्पर्धेत ती निवडली गेली. मिस पुणे साठी ऑडिशन दिली आणि येथेही विजेती ठरली. विजयाची ही शृंखला अबाधित ठेवत मिस फेमिना व मिस डिव्हाईनचे सब टायटल जिंकत तन्वीला लहानपणापासूनच बोलण्याचा, अभिनय करण्याचा आणि कॅमेऱ्यासमोर प्रेझेंट राहण्याचा छंद होता. तिने काही वर्ष रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले. त्या सोबतच वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, म्युझिक अल्बम्स देखील केले आहेत.