जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिनांक १० एप्रिल म्हणजेच जागतिक होमिओपॅथिक दिवसाच्या निमित्ताने होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जळगावात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
होमिओपॅथी ही चिकित्सा पद्धती आज जगभरात कोट्यवधी नागरिकांच्या विश्वासाचा भाग बनली आहे. ही चिकित्सा पद्धत रोग दाबत नाही, तर त्याचे मूळ कारण शोधून त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करते, यामुळे ती विश्वासार्ह मानली जाते. यामुळे होमिओपॅथिची लोकप्रियता वाढली आहे. याचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन यांची जयंती जळगावात साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम टीम एपोरिझम (Aphorism) या बॅनरखाली घेण्यात आला. डॉक्टर अपर्णा वाणी, डॉक्टर तृप्ती बढे, डॉक्टर कमलेश मराठे आणि डॉक्टर प्रणय वाणी यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस जळगाव येथे कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भरतदादा अमळकर (अध्यक्ष, केशवमृती प्रतिष्ठान), स्वानंद झारे (प्रांत सह कार्यवाह, देवगिरी प्रांत राष्ट्रीय सेवा संघ) आणि डॉक्टर राहुल महाजन (कन्सल्टिंग फिजिशियन) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात डॉक्टर रितेश पाटील यांना ‘युथ आयकॉन ऑफ होमिओपॅथी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड डॉक्टर विलास महाजन, डॉक्टर सुरेश अग्रवाल, डॉक्टर विवेकआनंद जोशी, डॉक्टर अजित बोरवले आणि डॉक्टर अपर्णा मकासारे यांना प्रदान करण्यात आला. शेखर प्रभू देसाई यांच्या होमिओपॅथी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉक्टर तृप्ती बढे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर अपर्णा वाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर कमलेश मराठे व डॉक्टर प्रणय वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.