स्वीकृत नगरसेवक पदासाठी विराज कावडिया यांच्या नावाची शिफारस

जळगाव प्रतिनिधी | महापालिकेत शिवसेनेतर्फे स्वीकृत नगरसेवकपदी सामाजिक कार्यकर्ते तथा युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडिया यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवकपदावर कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी अनेक जणांची नावे चर्चेत होती. यात अलीकडच्या काही दिवसांमध्ये युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. आज अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विराज कावडिया यांनी २०१८ साली झालेली महापालिका निवडणूक ही शिवसेनेकडून लढविली होती. मात्र यात त्यांना यश आले होते. तथापि, युवाशक्ती फाऊंडेशन आणि युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले असून याच सक्रीयतेमुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळाल्याचे मानले जात आहे.

युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडिया यांची स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेतर्फे शिफारस करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी आज दिली आहे. यामुळे कावडिया यांच्या नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Protected Content