जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | टिईटी घोटाळ्यातील छाप्यात म्हाडाच्या पेपरफुटी संदर्भात जळगावातून बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना अटक करण्यात आली आहे.
टिईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परिक्षेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावात छापेमारी केली. यात टिईटी सोबतच म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावात आढळून आले. या अनुषंगाने गोलाणी मार्केटमधील बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना अटक करण्यात आली आहे.
विजय दर्जी यांची बालाजी प्लेसमेंट नावाने गोलाणी मार्केटमध्ये त्यांची शाखा आहे. यात सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात. दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांच्या टीईटी घोटाळ्याची तपासणी सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. या प्रकरणात दर्जींच्या कार्यालयातील एका कर्मचार्याची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानुसार बुधवारी पथक जळगावात धडकले. पथकाने चौकशीअंती ऍड. दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेण्यात आले आहे.