Home क्राईम जळगाव भाजीपाला मार्केटमध्ये हाणामारी ; लिलाव बंद

जळगाव भाजीपाला मार्केटमध्ये हाणामारी ; लिलाव बंद


maramari
 

जळगाव (प्रतिनिधी) येथील कृषी बाजार उत्पन्न समितीला लागून असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त असून यामुळे भाजीपाल्याचा लिलाव बंद करण्यात आला आहे.

 

आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास कृषी बाजार उत्पन्न समितीला लागून असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हाणामारी नेमकी कुणा-कुणामध्ये झाली? आणि कशावरून झाली? याची खरी माहिती अद्याप समोर आलेली नाहीय. परंतू एका हमालाने व्यापाऱ्याच्या कानशिलात लावल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे.  दरम्यान, बाजार समितीतील भाजीपाल्याचा लिलाव मात्र बंद करण्यात आला असल्याचे कळते.


Protected Content

Play sound