जळगाव प्रतिनिधी | सध्या संप करण्याऱ्या दोन एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू अाहेत. साेमवारी नवीन दाेन संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात अाले. आतापर्यंत ३८७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ प्रशासनावर आली. तर १७ जानेवारी अखेर सेवा समाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८६, प्रशासकीय बदल्या ३९, तर बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ९८ अशी आहे. दरम्यान, साेमवारी ९ शिवशाही व १४८ साध्या बसेस अशा जिल्ह्यात १५७ बस धावल्या. त्यातून ५ हजार ९९ प्रवाशांनी सोमवारी दिवसभरात एसटीने प्रवास केला आहे.
यासोबत सहा कर्मचारांना बडतर्फीच्या नोटीसा सुद्धा देण्यात आल्या आहेत. एका आठवड्यात त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.