जळगाव प्रतिनिधी । टिव्ही विक्रीचा व्यवसाय असल्याचे भासवून अयोध्या नगरातील व्यापाऱ्याला साडे तीन लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, संदीप सुभाष महाजन (वय-३२) रा. सिध्दी विनायक शाळेजवळ, आयोध्या नगर हे कुटुंबियांसह राहतात. त्यांचे एमआयडीसीतील सदगुरू नरात श्रध्दा इंटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. संदीप महाजन यांनी ऑनलाईन इंडिया मार्ट म्हणून इंटरनेट सर्च केले. त्यावेळी त्यांना ११ मे रोजी दुपारी १२ वाजता नागपूर येथील इमस्पेक्सीया सोर्स इंडिया प्राईव्हेट लिमिटेड कंपनीच्या काही सदस्यांनी संदीप महाजन यांच्याशी संपर्क साधला. कंपनीच्या माध्यमातून टीव्ही विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे महाजन यांना भासवले. त्यानुसार बनावट नावे असलेल्या अश्विन अजय सोमकुंवर आणि लता अजय सोमकुंवर रा. आयटी पार्क रोड, गायत्री हॉटेलच्या समोर नागपूर यांनी संदीप महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार महाजन यांनी नागपूर येथील आकृती अग्रवाल आणि सिध्दार्थ पटेल यांनी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून व्यवहार करण्याबाबत चॅटींग सुरू केले. ८३ टिव्हीची ७ लाख रूपयांची ऑर्डर डन झाली. ऑर्डर बुक केल्यानंतर ५० टक्के रक्कम साडेतीन लाख रूपये महाजन यांनी दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये टाकले. यात ५ वाजता १ लाख, ७.३० वाजता ५० हजार आणि ८ वाजता २ लाख असे ३ लाख ५० हजार रूपये ऑन्लाईन पाठविले. संदीप महाजन यांचे ओळखीचे काही व्यक्ती नागपूर येथे असल्यामुळे ऑर्डर घेण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर पाठविले. मात्र दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे समोर आले. आणि इकडे नागपूर येथील दोघांचे मोबाईल नंबर बंद झाले. महाजन यांनी वारंवार फोन लावून संपर्क होवून शकला नाही. बुधवारी सकाळी १० वाजता देखील पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतू काही उपयोग झाला नाही. दरम्यान आपली फसवूणक झाल्याचे महाजन यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. संदीप महाजन यांच्या फिर्यादीवरून नागपूर येथील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.