शॉपींग कॉम्प्लेक्स खुलण्याची व्यापार्‍यांना उत्सुकता; मात्र नियमांमुळे नाराजी ( व्हिडीओ )

जळगाव राहूल शिरसाळे । लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ५ ऑगस्टपासून शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकाने खुलणार असल्याने शहराच्या विविध संकुलांमधील दुकानदारांमध्ये उत्सुकता आहे. तथापि, आठवड्यातील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय हा थोडा नाराजी व्यक्त करणारा ठरला आहे.

काल जिल्हाधिकारी व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत व्यापारी संकुलांमधील दुकाने उघडण्याबत एकमत झाले. यानुसार आठवड्यातील तीन दिवस दुकाने पूर्णपणे बंद ठेवून दुकाने खोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन लागल्यापासून अन्य दुकाने नियमांच्या अधीन राहून खोलण्यास परवानगी मिळाली असली तरी शॉपींग कॉम्प्लेक्स खुले झाले नव्हते. यामुळे तब्बल साडेसार महिन्यांपासून घरी बसून असणार्‍या व्यापारी बांधवांना पुन्हा एकदा व्यापार करण्यास परवानगी मिळणार असल्याने ते खुशीत आहेत. तथापि, प्रशासनाने आठवड्यातील तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा नियम घालून दिल्यामुळे ते काहीसे नाराज आहेत. लवकरात लवकर मुंबईप्रमाणे सर्व दुकाने दररोज चालू ठेवण्याची परवानगी मिळावी अशी अपेक्षा महात्मा फुले मार्केटमधील व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. या संकुलातील असोसिएशनच्या सदस्यांशी केलेल्या वार्तालापासून हीच बाब समोर आली. अर्थात, सर्वांना आता उद्या दुकाने सुरू होण्याची उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.

खालील व्हिडीओत पहा व्यापार्‍यांचे नेमके म्हणणे आहे तरी काय ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/586897248680016

Protected Content