जळगाव प्रतिनिधी । Jalgaon महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करणारे एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांना पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी याबाबतची घोषणा केली.
अलीकडेच झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी मतदान केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. Jalgaon जळगाव महापालिकेत शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम यांनी एकत्रीतपणे सत्ता काबीज केल्यावरून चर्वण सुरू असतांना आता एमआयएमतर्फे याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करणार्या रियाज अहेमद बागवान, सईदा युसूफ शेख, सुन्नाबी राजू देशमुख या तीन नगरसेवकांना निलंबीत करण्याची घोषणा केली. त्या तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.