Home Cities जळगाव जळगाव तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

जळगाव तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात


tahasil zendawandan

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्रसंगी उपस्थित असलेल्या केसीई सोसायटीच्या गुरुवर्य प.वि.पाटील तसेच नंदिनीबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले तर पोलीस प्लाटुनकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, लक्ष्मण सातपुते, नायब तहसीलदार लीला कोसोदे, शीतल सावळे, देवेंद्र चंदनकर, उपशिक्षक योगेश भालेराव, शिक्षिका इंदू चौधरी आदी कर्मचारी तसेच महिला मंडळ उपस्थित होते.


Protected Content

Play sound