जळगाव, प्रतिनिधी | नवीदिल्ली येथे दि.१३ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०१९ दरम्यान रेख्ता फाऊंडशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘जश्ने -रेख्ता २०१९’ कार्यक्रमात जळगाव येथील तरुण शायर फहिम कौसर (फहिम शेख मुख्तार) यांनी आपला सहभाग नोंदवला.
‘जश्न-ए-रेख्ता’मध्ये उर्दु कला साहित्यातील बैतबाजी, कव्वाली, गजल, मुशायरा, ड्रामा असे विविध कार्यक्रमांची प्रस्तुती करण्यात आली. शायर फहिम कौसर हे जळगाव महानगरपालिकेत, नगररचना विभागात कर्मचारी आहेत. त्यांनी गेल्या वर्षीही याच कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. याशिवाय आतापर्यंत अनेक कविसंमेलन आणि मुशायऱ्यातही ते सहभागी झाले आहेत. ‘जश्न-ए-रेख्ता २०१९ ‘मध्ये नामवंत शायर डॉ.राहत इंदौरी, मुनव्वर राणा, जावेद अख्तर, अभिनेत्री दिव्या दत्ता व इतर मान्यवर उपस्थित होते.