जळगाव शहराच्या विकासासह जनतेचे प्रश्न सोडविणार- अभिषेक पाटील

abhi in jalgaon

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराच्या विकासासाठी आपल्याकडे व्हिजन असून लोकप्रतिनिधी म्हणून आपण कायम आग्रही भूमिका घेऊन तत्पर राहून कायम जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे व महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी मतदारांना दिले. जळगावकरांच्या माझ्याकडून खुप अपेक्षा आहेत. तरुण चेहरा म्हणून मला पसंती मिळत असून २४ तास उपलब्ध राहणार आणि जळगावकरांच्या ऋणात राहू अशी ग्वाही राष्ट्रवादी युवकचे महानगराध्यक्ष तथा उमेदवार अभिषेक पाटील यांनी दिली.

या भागात केला दौरा
अभिषेक पाटील यांनी आज शहरातील गाडगेबाबा चौक, समतानगर, महाबळ, संभाजी नगर, आदर्श नगर, दौलत नगर, मोहाडी रोड या भागांत प्रचार रॅली काढली, तर दुपारच्या सत्रात राम मंदीर, पांझरपोळ, विठ्ठल पेठ, मारोती पेठ, जुने जळगाव, एस.टी.वर्कशॉप, अजिंठा हाऊसिंग सोसायटी, कासमवाडी, रायसोनी शाळा परिसरात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी अभिषेक पाटील यांनी तरूणांशी संवाद साधला तसेच नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले.

राष्ट्रीय एस.टी.कामगार काँग्रेसचा पाठिंबा
राष्ट्रीय एस.टी. कामगार काँग्रेसतर्फे आज राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असून त्यांना निवडून आणण्यासाठी पूरेपूर मदत करू, असे जाहीर केले आहे. जळगाव शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनीदेखील त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Protected Content