साधेपणाने होणार संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा

जळगाव प्रतिनिधी | संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा यंदाचा संजीवन समाधी सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय समाजबांधवांतर्फे घेण्यात आला आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा ६ ऑगस्ट रोजी होत आहे. कोरोनामुळे शासन निर्णयानुसार यंदाही हा सोहळा साध्या पद्धतीने होणार आहे. सर्व समाज बांधव, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व शहर अध्यक्षांनी हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करावा. यात प्रत्येक समाज बांधवांनी आपल्या घरी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व नैवेद्य दाखवून नामदेव महाराजांच्या पसायदानाचे संपूर्ण कुटुंबाने पठण करायचे आहे. तसेच स्थानिक मंडळ, संस्था यांनी देखील वातावरण पाहून शासकीय नियमानुसार नामदेव महाराजांच्या पसायदानाचे पठण करावे, असे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागुल यांच्या आवाहनानुसार जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कापुरे यांनी जाहीर केले आहे. समाजबांधवांनी यानुसार सोहळा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष संचालक विवेक जगताप, राज्य संघटक अरुण शिंपी, उपराज्य संघटक मनोज भांडारकर, शिवाजी शिंपी, प्रशांत कापूरे, अनिल खैरनार, अनिल वारुळे यांनी केले आहे.

Protected Content