जळगावात धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू

Crime

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोड आनंदनगर येथी तरुणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यु झाला. रेल्वे प्रबंधकांनी कळवल्यानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहाडीरोड आनंदनगर येथील रहिवासी अंकित संजय पाटील (वय-22) हा बांभोरी येथील कंपनी ऍप्रेंटीशीप कामगार म्हणुन कार्यरत होता. मंगळवार (ता.24) रोजी अंकित कोणासही काहीएक न सांगात बेपत्ता झाला होता. रात्री आठ वाजेच्या दरम्याने शिरसोली-जळगाव रेल्वेरुळावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. उपस्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांनी खबर दिल्यावरुन रामानंदनगर पोलिसात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली होती. तपासाधिकारी मनोज इंद्रेकर यांनी मृतदेहा जवळ सापडून आलेल्या कपड्यांवरुन कुटूंबीयांना संपर्क करुन घटना कळवली. कुटूंबीयांनी मृतदेह ओळखला असून तो, अकितचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मृत्युचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही.

Protected Content