Home क्राईम जळगावात प्रेमीयुगूलाचे अश्लील चाळे; नागरीकांकडून चोप

जळगावात प्रेमीयुगूलाचे अश्लील चाळे; नागरीकांकडून चोप

crime-2

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । मू.जे.महाविद्यालय परिसरात एका चारचाकीत प्रेमीयुगूल अश्लील चाळे करीत होते. भररस्त्यावर हा प्रकार एुरू असल्यामुळे संतापलेल्या नागरीकांनी या जोडीस बाहेर काढून चांगलाच चोप चोप दिला. यांनतर दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले व दोघांना ताकीद देऊन सोडण्यात आले.

बांभोरी येथे राहणारा हा तरुण असल्याचे समोर आले आहे. हा तरुण चारचाकीने (एमएच १९ एई ५४००) जळगावात आला होता. या चारचाकीत गणेश कॉलनी परिसरातील एक तरुणी देखील बसलेली होती. प्रेमीयुगूलाने मू.जे.महाविद्यालय परिसरात चारचाकी उभी करुन अश्लील चाळे सुरू केले होते. हा प्रकार पाहुन काही संतप्त नागरीकांनी तरुणास चांगलाच चोप दिला. यानंतर निर्भया पथकास पाचारण करण्यात आले होते. हा तरुण पथकातील मंजुळा तिवारी यांना देखील जुमानत नव्हता.

गाडीच्या खाली उतरण्यास तयार नव्हता. सर्व काच बंद करुन ठेवल्या होत्या. अखेर तिवारी यांनी पथकासह बळाचा वापर करुन प्रेमीयुगूलास खाली उतरवून चोप दिला. यानंतर दोघांना रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले होते. या घटनेमुळे मू.जे.महाविद्यालय तसेच रामानंदनगर पोलिस ठाण्यात प्रचंड खळबळ उडाली होती. दोघांना ताकीद देऊन सोडण्यात आले.


Protected Content

Play sound