जळगाव प्रतिनिधी । पतीच्या अकाली निधनानंतर मानसिकदृष्या खचलेल्या महिलेने आज पहाटे पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात महिला 100 टक्के भाजल्या केल्या असून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, आशाबाई संजय माळी (वय-40) रा. धनगरवाडा, पाळधी यांच्या पतीचे तीन वर्षापुर्वी अकाली निधन झाले. त्यांना अमोल माळी (वय-19) मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी आहे. पतीच्या अकाली निधनामुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता. त्याच्यावर खासगी रूग्णालयात मानसोपचाराबाबत उपचार घेत आहे. दरम्यान, आज सकाळी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घरात मुलगा आणि मुलगी झोपत असतांना अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. पेट घेतल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर मुलगा अमोल झोपतून जागा झाला आणि आई जळत असल्याचे पाहून त्याने अंगावर पाणी टाकून आग विझविली. व खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान वैद्यकिय अधिकारी यांना तपासणी केली असता त्या 100 टक्के भाजल्या गेल्या आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
यापुर्वीही पाच दिवस होती गायब
मानसिक दृष्या खचलेल्या आशाबाई यांनी शुक्रवारी 27 रोजी एका कॅनमध्ये 300 रूपयांचे पेट्रोल घेतले होते अशी माहिती त्यांनी जखमी आवस्थेत सांगितले. यापुर्वी आशाबाई ह्या घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्यावेळी नातेवाईकांना शोधाशोध केली होती. पाच दिवसानंतर परत घरी आल्या होत्या अशी माहिती मुलगा अमोल याने सांगितले.