जळगाव प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रात्री ट्रक कलंडला. सुदैवाने यात हानी झाली नसली तरी यामुळे यामुळे वाहतुकीचा बराच वेळ खोळंबा झाला होता.
याबाबत वृत्त असे की, जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील बाजार समिती समोर बुधवारी रात्री चालक हा बारदानांनी भरलेला ट्रक (एमएच-३१, सीबी- ९४२२) बाहेर आणत होता. या ट्रकमध्ये बारदान होते. यातच चालकाचा ताबा सुटल्याने अचानक ट्रक कलंडला. या वेळी ट्रकच्या बाजूलाच उभ्या असणार्या इसमाने प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतली. यामुळे यात कुणाला दुखापत झाली नाही.
दरम्यान, यामुळे अजिंठा चौफुलीपासून औरंगाबादकडे जाणार्या रस्त्यावर बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.