जळगाव Jalgaon प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
ना. जयंत पाटील Jayant Patil हे मंगळवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी ८ वा. मोटारीने औरंगाबाद येथून चाळीसगावकडे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक होईल. यानंतर दुपारी १२.०० वाजता ते धुळे शहराकडे प्रयाण करणार आहेत. ना. पाटील हे दोन दिवस धुळे जिल्ह्यात असून यानंतर ते पुन्हा जळगाव जिल्ह्यात येणार आहेत.
यात ना. जयंत पाटील हे गुरुवार, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी पाडळसरे येथे येणार असून ते निम्न तापी प्रकल्पाला भेट देऊन जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसमवेत चर्चा करणार आहेत. यानंतर ते दुपारी अमळनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेतील. यानंतर दुपारी १२ वा ४५ ते २.०० वाजता पाडळसरे, ता. अमळनेर येथे राष्ट्रवादी परीवार संवाद Ncp Parivar Samvad असून नंतर ते पारोळ्याकडे प्रयाण करणार आहेत.
पारोळा येथे दुपारी साडेतीन वाजता एरंडोल विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर ते पारोळा येथून पाचोरा येथे जातील. येथे सायंकाळी सहा वाजता पाचोरा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक होणार आहे. तर सायंकाळी साडेसात वाजता त्यांची जामनेर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक होईल. ही बैठक आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे मुक्कामी राहणार आहेत.