जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने शहरात मोठा गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने याच भागात असणार्या एका पान सेंटरवर धाड टाकण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून पोलिस पथकाने याच्या पंचनाम्यासह पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात गुटखा अगदी उघडपणे विकला जात असल्याच्या तक्रारी येत असतांना पोलीस पथकाने केलेली ही कारवाई महत्वाची मानली जात आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले. तेव्हा गुटख्याच्या पुड्यांचे मापन सुरू होते. दरम्यान, याच कारवाई सोबत कुमार चिंथा यांच्या पथकाने याच परिसरातील एका सट्टा पेढीवरही धाड टाकून सट्टा खेळणार्यांना ताब्यात घेतले आहे.