परिवर्तनच्या महोत्सवात पाथेर पांचालीचे अभिवाचन

जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन जळगाव या संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजीत महोत्सवात बंगाली साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या पथेर पांचाली या कादंबरीचे अभिवाचन करण्यात आले.

परिवर्तनतर्फे साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पाथेर पांचाली कादंबरीचे ऑनलाइन सादरीकरण करण्यात आले. आत्याबाईंच्या भूमिकेत नयना पाटकर यांनी आपल्या सहजसुंदर वाचनाने रंग भरले. अनिल पाटकर यांच्या निवेदनासह नारायण बाविस्कर यांनी उभ्या केलेल्या विविध भूमिका, मंजूषा भिडे, गायत्री कुलकर्णी यांनी अंगभूत शैलीने प्रभावीपणे सादरीकरण केले. मोना निंबाळकर, स्वरा जोशी यांनी उत्तम भूमिका साकार केल्या. अभिवाचनाची संकल्पना व दिग्दर्शन शंभू पाटील यांची होती. पार्श्‍वसंगीत राहुल निंबाळकर यांचे होते.

दरम्यान, या महोत्सवात सोमवारी सायंकाळी ६ वाजता शंभू पाटील लिखित गांधी नाकारायचा आहे पण कसा? याचे अभिवाचन करण्यात येणार आहे.

Protected Content