जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यामुळे आता १६ मार्चपासून संपूर्ण जिल्ह्यात रात्री दहा ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकार्यांनी दिले आहेत. या संचारबंदीचे संपूर्ण नियम जाणून घ्या.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्ह्यात १६ मार्चपासून रात्री दहा ते सकाळी पाच या कालावधीच संचारबंदी जाहीर केली आहे. या संचारबंदीतील नियम खालीलप्रमाणे असतील.
१) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस दिनांक १६/०३/२०२१ पासून बंद राहतील. तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शेक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित रहावे. तथापि इयत्ता १० वी व १२ वी बाबतीत पालकांचे संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील. राष्ट्रीय /राज्य विद्यापीठ/शासनशिक्षण मंदल कतरावरील सापर्वीच पेषित झालेल्या परीक्षा कोविड-१९ विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.
३) अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ ५० % क्षमतेच्या मर्यादेत कोविड -१९ नियमावलीचे पालन करुन सुरु ठेवता येतील.
४) जळगांव जिल्हयातील सर्व दुकाने सकाळी ७.०० ते रात्री ७.०० या कालावधीत चालू राहतील. मात्र हे निर्बंध अत्यावश्यक सेवा/मनुष्य व प्राणीमात्रासाठी जीवनाश्यक वस्तु, भाजीपाला, फळे, किराणा, दुध व वृत्तपत्र वितरण या बाबींना लागू राहणार नाहीत.
५) जळगांव जिहयातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
६) अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ २० लोकांनाच उपस्थित राहता येईल.
७) लग्न समारंभ व इतर समारंभ दिनांक २०/०३/२०२१ पर्यंतचे पूर्व नियोजित असलेल्या कार्यक्रमांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशन यांचेकडून परवानगी घेण्याच्या व कोविड-१९ चे वाबतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधिन राहून तसेच आयोजक व मंगल कार्यालय/लॉन्स, हाल्सचे मालक यांनी याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था थ संबंधित पोलीस स्टेशनकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे अटीवर सकाळी ०७.०० ते रात्री ०७.०० वाजता या वेळेत घेण्यास परवानगी राहील. दिनांक २०/०३/२०२१ पासून लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजनिक मोकळया ठिकाणी व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर
कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
८) लग्न समारंभ व इतर समारंभाचे मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलीचे पालन करुन घरच्या घरी शास्त्रोक्त/वैदीक पध्दतीने अथवा नोंदणीकृत विवाह पध्दतीने साजरा करण्यात यावेत. नोंदणीकृत विवाहासाठी जास्तीत जास्त २० व्यक्तीनी उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
९) जिल्ह्यातील सर्व प्रकारचे सामाजिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सव, समारंभ, यात्रा, दिंडया, ऊरुस व तत्सम धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंदच राहतील.
१०) सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ ०५ लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरीता खुली राहतील. सदरची ठिकाणे सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०७.०० वाजेपावेतो शनिवार व रविवार या दिवशी पूर्णपणे बंद राहतील.
१) सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील.
१२) जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टैंक हे राज्यस्तरीय/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांना वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील. तथापि सामुहिक स्पर्धा /कार्यक्रम बंद राहतील.
१३)सर्व प्रकारचे सिनेमागृहे, मनोरंजन पार्कस, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे पूर्णपणे बंद राहतील.
१४) खाद्यगृहे, परमिट रुम/बार फक्त सकाळी ०७.०० ते रात्री ०९.०० वाजेपावेतो कोविड-१९ चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन ५० टक्के टेबल्स क्षमतेने सुरु राहतील. होम डिलिव्हरी चे किचन /वितरण कक्ष रात्री १०.०० वाजेपावेतो सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
१५) कायद्याव्दारे बंधनकारक असणाच्या वेधानिक सभांना केवळ ५० लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परबानगी राहील.( तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहील.) मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगांव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या सुरु राहतील व त्यांना मर्यादेतून सूट राहील.
१६) सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचार्यांची येळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबीचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कॉविड-१९ ची लक्षणे दिसून येणारया संशयित कर्मचार्यांची कोविड-१९ चाचणी करुन घेण्याची जवाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.
१७) जळगाव जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता, सदर ठिकाणी गर्दी नियंत्रित करणे, सर्व व्यक्तींनी चेहर्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सीगचे पालन करणे तसेच संनिटाईजरचा वापर करणे व हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची राहील. सदर बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे शेतकरी ब खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश असेल. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही रिटेलर्स (किरकोळ व्यापारी) यांना प्रवेश असणार नाही.
यानुसार जिल्हा प्रशासनाने नियम जाहीर केले आहेत.