जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद कार्यक्रमानिमत्त काढलेल्या राज्यव्यापी दौर्यात जळगाव जिल्ह्यात दोन दिवस येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद या मोहिमेच्या अंतर्गत राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या अनुषंगाने ते जळगाव जिल्हा दौर्यावर ११ व १२ फेब्रुवारी रोजी येणार आहेत.
११ फेब्रुवारीला सकाळी जयंत पाटील यांचे पाडळसरे येथे आगमन होईल. त्यानंतर धरणावर अमळनेरात आढावा बैठक होईल. त्यानंतर पाडळसरे येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम झाल्यावर ते अमळनेर येथे बैठक घेणार आहेत. यानंतर जयंत पाटील पारोळा येथे एरंडोल मतदार संघाची आढावा बैठक घेतील. तेथून पाचोरा येथे रवाना होतील. पाचोर्यात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन मंत्री पाटील जामनेरात येतील. तेथे विधानसभा मतदार संघातील आढावा बैठकीनंतर ते जळगाव येथे अभिषेक पाटील यांच्याकडे मुक्कामी असतील.
दुसर्या दिवशी त्यांची भुसावळ, मुक्ताईनगर, फैजपूर आणि चोपडा येथे आढावा बैठक होणार आहे. आगामी सहकार आणि त्यांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जयंत पाटील यांचा हा दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. तसेच या दौर्यात ते तापी खोरे विकास महामंडळासह जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेणार आहेत.