जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे या उद्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला भेट देणार असून त्यांच्याहस्ते ऑक्सीजन प्लांट व आरटीपीसीआर लॅबचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दोन मोठ्या ऑक्सीजनचे स्टोअरेज टँक लावण्यात आलेले असून येथे आरटीपीसीआर लॅब देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. यांच्या मदतीने येथे ऑक्सीजन मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेला असून कोविडच्या आपत्तीत याचा हजारो रूग्णांना लाभ झाला आहे. तर आरटीपीसीआर लॅबच्या माध्यमातून अवघ्या २४ तासांमध्ये रूग्णांना कोरोना चाचणीचा अहवाल मिळत असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार शक्य झाले आहेत.
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील ऑक्सीजन स्टोअरेज टँक आणि आरटीपीसीआर लॅबचे लोकार्पण प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्षा तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती शिंदे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. कोविडच्या नियमांचे पालन करून सायंकाळी चार वाजता याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांनी दिली आहे.